‘कॉपी’ : बाजारू शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट
वर्गापेक्षा शाळेनंतर जादाचे वर्ग (ट्यूशन) घेऊन पैसे कमवणारे शिक्षक, वेळेवर पगार न मिळणारे शिक्षक, सरकारी अनुदान घेऊन स्वतःच्या खिशात घालणारे संस्थाचालक, बेजबाबदार पालक आणि विद्यार्थी, होतकरू विद्यार्थ्यांची होरपळ, शिक्षणाच्या बाबतीत कौटुंबिक स्तरावर चालणारा मुलगा-मुलगी असा भेद आणि ‘व्यवस्था भ्रष्ट आहे’ म्हणणारा परिघावरचा मोठा वर्ग, अशा अनेक बाजूंची उभी-आडवी मांडणी सिनेमात आहे.......